नायलॉन मांजा बाळगणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

बारामती : नागपंचमीमुळे पतंग उडविण्यासाठी बेकायदा बंदी असलेल्या चायनीज नायलॉन मांजा बाळगणाऱ्या चौघांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने चायनीज नायलॉन मांजा विक्री करणारे आणि तो मांजा वापरनारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
बारामतीत नागपंचमीदिवशी चायनीज नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तो चायनीज नायलॉन मांजा वापरणारे आणि बाळगणारे यांचावर धडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत तर या गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये दोघे आरोपी अल्पवयीन आहेत तर दोघे सज्ञान आहेत.
या चायनीज नायलॉन मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी अनेक जागृत नागरिकांनी पोलिस प्रशासनाला वेळीच सनाआधी कारवाईसाठी निवेदने दिली होती प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन ( नगरपालिका ) आणि पोलिस प्रशासन गाफील राहिले मात्र पंचमीदिवशी मांजाच्या अनेक दुर्घटना समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने धडक धाडी टाकण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मिळून आलेल्या मांजाची विल्हेवाट लावत वापर करणारांवर गुन्हे दाखल केले आहेत तसेच विक्री करणारांचा युद्ध पातळीवर तपास सुरु आहे.
एकूणच जरी पोलिस प्रशासनाने चायनीज नायलॉन मांजा बाळगणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी अद्याप कोणत्याच कारवाईत चायनीज नायलॉन मांजाचा मोठा साठा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही मात्र हा मांजा विक्री करणे आणि वापर करणारे यांनी वेळीच सावध व्हावे आणि त्या मांजाचा वापर, विक्री करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की. कारण तुमचे क्षणिक सुख दुसऱ्याच्या जीवावर बेतत आहे याची नोंद आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे.