पारंपारिक प्रथांना फाटा देत पुण्यस्मरनार्थ सामाजिक उपक्रम
बारामती : कै. शिवराज गणेश खोमणे या थालेसेमिया सारख्या दुर्धर आजाराशी झुंज एक वर्षापूर्वी थांबली. त्याच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पारंपारिक वर्षश्राद्धाला फाटा देत लोकोपयोगी सामाजिक उपक्रम आयोजित करून श्रद्धांजली वाहिली.
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील गणेश खोमणे यांचा मुलगा शिवराज हा मागील 12 वर्षांपासून थालेसेमिया या दुर्धर आजाराशी झुंज देत होता त्याला दर महिन्याला रक्त भरावे लागत होते मात्र एक वर्षापूर्वी त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे गणेश खोमणे यांनी खोमणे परिवार व ग्रामस्थ यांच्या वतीने शिवराजच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर आणि शालेय विध्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याला ग्रामस्थांनी देखील प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी सरपंच आदित्य काटे, ग्रामसेवक सय्यद, सतीश काटे, परशुराम आडके, ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बारवकर, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, गणेश खोमणे पत्रकार योगेश भोसले आदी मान्यव उपस्थित होते. तर बारामतीच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा आहे तसेच बारामती परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण देखील आहेत त्या पार्श्वभूमीवर या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने अनेक गरजु रुग्णांना मदत होणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशवी होण्यासाठी गणेश खोमणे, प्रवीण भंडलकर, निलेश खोमणे, गौरव मदने, भारत भोसले, योगेश खोमणे, गणेश चव्हाण, प्रतिक रासकर, भाऊ खोमणे, मुर्लीधर जाधव, निखिल आडके, सुरज आडके, राजेंद्र खोमणे, अभिजित भंडलकर यांनी परिश्रम घेतले.
