स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आमरण उपोषण

बारामती : बारामती औद्योगिक विकास महामंडळ आणि मधील माथाडी बोर्ड तसेच तेथील अधिकारी वर्ग मिळुन महाराष्ट्र शासनाचा महसुल बुडवत असल्याने बारामतीच्या औद्योगिक कार्यालयासमोर छावा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश निकम हे अमरण उपोषणास बसले आहेत.
स्थानिक रहिवाशांना प्राधान्य न देता परप्रांतीय मजूर लोकांना कामावर नेमणुक करीत आहेत. तसेच बारामती, इंदापूर व दौंड येथील भूमिपुत्रांना डावलुन त्यांच्या जमिनी संपादीत करून देखील त्यांना रोजगार दिला जात नाही. या संदर्भाने छावा संघर्ष माथाडी व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने बारामती औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयात अनेकदा तक्रार अर्ज केले होते मात्र त्याची दाखल बारामतीच्या औद्योगिक विकास महामंडळ आणि माथाडी बोर्डाने न घेतल्याने उपोषण करण्यात येत आहे.
औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामळे स्थानिकांनी विनाविरोध औद्योगिक विकास महामंडळा जमीन उपलब्ध करून दिल्या मात्र सध्या बारामतीच्या औद्योगिक विकास महामंडळाचे आणि माथाडी बोर्डाचे कोणत्याही खाजगी कंपनीवर अंकुश नाही त्यामुळे अनेक स्थानिक तरुणवर्ग बेरोजगार आहे सबब जर प्रशासनाने या आंदोलनाची योग्य दखल न घेतल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलने करण्यात येतील असेही निकम यांनी बोलताना सांगितले.