योग्यता प्रमाणपत्र विलंब शुल्क रद्द करा : बारामतीत ऑटो रिक्षा रॅलीच्या माध्यमातून निषेध मोर्चा

बारामती : ज्या रिक्षा चालकांनी आपल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले नसेल त्यांनी विलंब शुल्क भरण्याचा आदेश परिवहन विभागाने मे महिन्यात काढले होते. मात्र हे विलंब शुल्क रिक्षा चालकांना परवडणारे नसून ते रद्द करावे अशी मागणी करत बारामती इंदापूर दौंड रिक्षा कृती समितीने रिक्षा रॅलीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात येथील परिवहन कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
सदरचा निषेध मोर्चा बारामती इंदापूर दौंड ऑटो रिक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक डॉ. भीमराव मोरे (दौंड) यांच्या सहकार्याने काढण्यात आला. या मोर्चा कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कारभारी सर्कल ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पेन्सिल चौक येथून सरळ परिवहन कार्यालयाकडे वळविण्यात आला. या निषेध मोर्चात बारामती इंदापूर दौंड या तिन्ही तालुक्यातील रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
केंद्र सरकारने 2016 साली अधिसूचना काढून परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीनीकरण विलंब शुल्क 50 रुपये प्रतिदिन दंडाची तरतूद केली होती. मात्र त्यानंतर मुंबईमधील बस चालक यांनी त्या आधिसुचने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर 10 ऑक्टोबर 2017 रोजी परिवहन विभागाच्या या आदेशावर न्यायालयाने स्थगित आदेश दिलेला होता. त्यानंतर दोन एप्रिल 24 रोजी न्यायालयाने याचिका सुनावणीस घेऊन स्थगिती आदेश मागे घेतला व परिवहन विभागाने योग्यता प्रमाणपत्रासाठी जे पन्नास रुपये विलंब शुल्क घेण्याचे आदेश दिले होते. ते पुन्हा लागू केले या विरोध नाराजी व्यक्त करून तो विलंब आकार रद्द करावा या आशयाचे निवेदन येथील परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
सदर रिक्षा रॅली व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी दादासो शिंदे, अशोक कांबळे, उत्तम लोंढे, अण्णा समिंदरे, सागर सोनवणे, मनोज साबळे, किशोर कांबळे, अभिजीत भंडारे, लियाकत सय्यद, बाबा कोरी, अनिल चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.