शारदानगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी कार्यशाळा संपन्न.

बारामती : नियोजन व विकास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आयोजित शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत कार्यशाळा शारदानगर बारामती येथे नुकतीच संपन्न झाली.
संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ शैलेंद्र मुकणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी व त्यानुसार उच्च शिक्षणात होत असलेले बदल यांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ श्रीकुमार महामुनी यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयात असलेल्या आवश्यक त्या सोयी-सुविधा महाविद्यालयाचे विविध उद्योग, संशोधन संस्था प्रशिक्षण संस्था यांच्यासोबत झालेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार यांच्या बद्दल माहिती देऊन संस्थेमध्ये असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निर्मित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित चित्रफीत यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संपूर्ण माहिती, नव्याने आलेली शैक्षणिक पद्धती, झालेले बदल, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, मल्टिपल एन्ट्री मल्टिपल एक्झीट, एकसमान श्रेयांक/ क्रेडिट पद्धत, 3+1 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, पाच वर्षांचा एकात्मिक बहुविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर्स), पुढील वर्गातील प्रवेश कसे घ्यावेत ? कोणती विद्याशाखा निवडावी ? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर ठरणार आहे या स्वरुपाची माहिती उपस्थित विद्यार्थी व पालकांना यावेळी देण्यात आली.
उपस्थित पालकांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन कार्यशाळेचे समन्वयक प्रा. रा. बा. देशमुख यांनी केले. या कार्यशाळेसाठी बारामती तालुक्यातील व परिसरातील वेगवेगळ्या गावांमधून 57 पालकांनी सहभाग घेतला व 55 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उपस्थित पालकांपैकी किरण मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहभागी विद्यार्थिनींना उपस्थिती प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यशाळेचे सूत्र संचलन प्राध्यापक एस. पी. भगत यांनी केले तर, आभार प्रदर्शन डॉ. आर. एस. सुरवसे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कला व वाणिज्य प्रमुख डॉ. एम. आर. निंबाळकर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. पी.व्ही. जाधव, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. आर. जे. मराठे, डॉ. सुरवसे, प्रा. भगत, डॉ. कोठारी, प्रा.पवार, कार्यालय प्रमुख इनामदार, काळभोर, गवारे, वाबळे, माने आदींचे सहकार्य लाभले