बारामतीत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा सन्मान
बारामती : येथील शेरसुहास मित्र मंडळाने रविवारी (ता.१०) जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर नारीशक्तीचा,सावित्रीच्या लेकींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी या कार्यक्रमांतर्गत आमराई परिसरातील वकील,डॉक्टर,शिक्षिका,पोलीस कर्मचारी,परिचारिका,सफाई कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मानपत्र आणि एक झाड देऊन माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या निर्भया पथकाच्या प्रमुख अमृता भोईटे यांच्या हस्ते सन्मान करत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका अनिता जगताप, निता चव्हाण, भिमनगर महिला समितीच्या अध्यक्षा वृषाली घोरपडे, साक्षी रणदिवे उपस्थित होत्या.
यावेळी निर्भया पथकाच्या प्रमुख अमृता भोईटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत,भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या हक्क अधिकारांविषयी माहिती दिली.तर कठीण प्रसंगामध्ये महिलांनी,शालेय विद्यार्थिनींनी कशाप्रकारे आपले स्वसंरक्षण केले पाहिजे याबाबत जागृती केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सेजल अहिवळे, प्रा.सिद्धार्थ सोरटे, रितेश साळवे ,वासंती अहिवळे, सौरवी अहिवळे, भावना अहिवळे, प्रेरणा अहिवळे, राजश्री अहिवळे, पूजा लोंढे, प्रतिज्ञा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
