करवाढ न करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी
बारामती : नगरपालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता करात मोठी वाढ केली असून ती वाढ करू नये, अशी बारामतीकरांची मागणी आहे, याबाबत नगरपालिका प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष ॲड. संदीप गुजर व युवकाध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना खा. सुप्रिया सुळे यांच्या वतीने याबाबत निवेदन दिले आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी या निवेदनाद्वारे नमूद केले आहे की, बारामती शहर आणि परिसरात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने नागरिक चिंतेत आहेत . तसेच कोविड काळात झालेले नुकसान अद्याप भरून निघाले नाही त्यामुळे बारामती नगरपरिषदेने घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता करांमध्ये वाढ केली आहे ती वाढ मागे घ्यावी अश्या आशयाचे पत्र मुख्यधिकारी महेश रोकडे यांना दिले आहे.
