कृषिक, १७ ते २४ जानेवारी दरम्यान देशाच्या शेतीला दिशा देणारे भव्य कृषि प्रदर्शन
बारामती : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून आयोजित करण्यात येणारे ‘कृषिक’ हे जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे प्रदर्शन १७ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान १७० एकर प्रक्षेत्रावर भरणार असून दरवर्षी देशभरातून अडीच ते तीन लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात.
AI आधारित ‘Farm of the Future’ – भारतातील शेतीचे भविष्य बारामतीत
यावर्षीच्या कृषिक प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती प्रणाली. या प्रणालीअंतर्गत भारतातील पहिले Farm of the Future साकारले गेले आहे.उसाचे २०० टन प्रति एकर उत्पादन शक्य करणारे प्रात्यक्षिक. ऊस खोडव्याचे १५० टन प्रति एकर उत्पादन. राज्यातील ५ हजार शेतकऱ्यांची AI तंत्रज्ञानाद्वारे ऊस लागवड.
IoT, सेन्सर, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाइट मॅपिंग व रिमोट सेन्सिंगचा वापर.
AI आधारित पीक उत्पादनातील क्रांती, AI तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन घेता येत असल्याचे या प्रदर्शनात प्रत्यक्ष दाखवले जाणार आहे.केळी पीक : २५% पाणी बचत, ४०% खत बचत, ५० टन प्रति एकर उत्पादन, सघन मका : ७० ते ८० क्विंटल प्रति एकर उत्पादन, गोदावरी तूर : २० क्विंटल प्रति एकर उत्पादन,कांदा : ३० टन (६०० पिशवी) प्रति एकर उत्पादन, ६ इंच सेन्सर आधारित पाणी नियोजन.
फळबाग विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान
या प्रदर्शनात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. अवाकॅडो, लिची, रँबुटान, मॅंगोस्टीन, निळी-लाल केळी, पॅशन फ्रूट, एक खोड तंत्रज्ञान आधारित डाळिंब,बुलेट द्राक्षे – एका वर्षात उत्पादन देणारी, इस्राइल-जर्मनी आधारित फर्टिगेशन व ऑटोमेशन प्रणाली, निर्यातक्षम पेरू, द्राक्ष, डाळिंब उत्पादन तंत्र
हायड्रोपोनिक व आधुनिक भाजीपाला तंत्रज्ञान
हायड्रोपोनिक टोमॅटो, लेट्युस, स्ट्रॉबेरी, ब्रोकली, हायड्रोपोनिक व्हील – कमी जागेत तिप्पट उत्पादन, १५० पेक्षा अधिक देशी टोमॅटो वाण, ४० प्रकारचे वांगे, ४०० किलोचा भोपळा, युरोपियन टनेल टेक्नॉलॉजीद्वारे १८ ते २० टन उत्पादन
एरंडीपासून रेशीम उद्योग – शेतकऱ्यांसाठी नवे उत्पन्न साधन
एरंडी पीक : २० क्विंटल प्रति एकर उत्पादन, त्याच्या पाल्यापासून इरी सिल्क उद्योग – २ लाख रुपये प्रति एकर उत्पन्न
नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती प्रयोग
जीवामृत, शून्य मशागत, गांडूळखत, सेंद्रिय कडधान्ये, भाजीपाला, फळबाग, शेतीत होमिओपॅथीचा वापर.
रोबोटिक्स व स्वयंचलित शेती यंत्रणा
लेझर तणनियंत्रण मशीन, ड्रायव्हरविना ट्रॅक्टर, ड्रोन, हार्वेस्टर, स्वयंचलित खत-पाणी प्रणाली
स्वतंत्र पशुदालन – आधुनिक पशुसंवर्धन
देशभरातील विविध जातींची जनावरे, डच डेअरी तंत्रज्ञान, मत्स्यपालन, बदकपालन, अॅक्वापोनिक्स, भीमथडी घोडे, डॉग शो, जगभरातील तंत्रज्ञानाचा संगम, नेदरलँड, जपान, अमेरिका, इस्राइल, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, थायलंड यांसारख्या देशांतील AI, सेन्सर, रोबोटिक्स, स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञानाची भव्य मांडणी करण्यात आली आहे.
