October 23, 2025

बारामती नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा ; नगराध्यक्ष पद खुले

baramati-nagarparishad

बारामती : बारामती  नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण निश्चित करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयानंतर शहरातील राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले असून, संभाव्य उमेदवारांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. राजकारणात नव्या समीकरणांची नांदीच या आरक्षणातून दिसत आहे.

🔸 महिला उमेदवारांसाठी संधी

नगरपरिषदेत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने ४१ पैकी २१ जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गात उत्साहाचं वातावरण असून, अनेक नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता आहे.

 एकूण जागा आणि प्रभाग रचना

बारामती नगरपरिषदेच्या २० प्रभागांमधून एकूण ४१ नगरसेवकांची निवड होणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक (१ ते १९) आणि प्रभाग क्र. २० मधून तीन नगरसेवक निवडले जातील. नव्या आरक्षणामुळे काही विद्यमान नगरसेवकांना प्रभाग बदलावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्र. 1 – अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला , प्रभाग क्र. 2 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 3 – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 4 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5 – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 6 – सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 7 – ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 8 – नागरिकांचा मागास प्रवर्गमहिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 9 – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला ,  प्रभाग क्र. 10 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11 – सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 12 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 13 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 14 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 15 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 16 – अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 17 – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 18 – अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 19 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 20 –  अनुसूचित जाती,  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण

राजकीय चर्चांना उधाण

आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही प्रभागांमध्ये उमेदवारांचे चेहरे खुलले तर काहींची गणितं बिघडली आहेत. काहींसाठी हा कहीं खुशी, कहीं गम’ क्षण ठरला असून, नव्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत. मात्र चौका – चौकात राजकीय चर्चांना उधाण आले आहे .  आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवारांनी मैदानात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व पक्षांतील इच्छुकानी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!