October 24, 2025

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन ; बारामतीत २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद

rain-3

बारामती :  तालुक्यातील एकूण ८ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे. तर बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी 99224 47812 / 9359807492 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.

बारामती मंडळात ३०० मि.मी. माळेगाव बु.१६७-मि.मी., पणदरे २०५ मि.मी., वडगाव निंबाळकर २६१ मि.मी., लोणी भापकर २७९ मि.मी., मोरगाव २३२ मि.मी., सुपा १७८ मि.मी., उंडवडी क.प.१९३ मि.मी. याप्रमाणे सरासरी २२६.८७ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

तालुक्यात २३ मे अखेर सरासरी १४४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद

बारामती मंडळात १७३ मि.मी. माळेगाव बु.९२-मि.मी., पणदरे ११२ मि.मी., वडगाव निंबाळकर १६५ मि.मी., लोणी भापकर १८४ मि.मी., मोरगाव १६८ मि.मी., सुपा १३० मि.मी., उंडवडी क.प.१२८ मि.मी. याप्रमाणे सरासरी  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

२४ मे रोजी सरासरी ८२.८७ मि.मी पर्जन्यमानाची नोंद

तालुक्यात २४ मे रोजी (शनिवारी) बारामती मंडळात १२७ मि.मी. माळेगाव बु.७५-मि.मी., पणदरे ९३ मि.मी., वडगाव निंबाळकर ९६ मि.मी., लोणी भापकर ९५ मि.मी., मोरगाव ६४ मि.मी., सुपा ४८ मि.मी., उंडवडी क.प.६५ मि.मी. याप्रमाणे सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

झालेल्या अवकाळी पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे तसेच तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथील काटे वस्ती नजीक कॅनॉल फुटल्याने त्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

You may have missed

error: Content is protected !!