October 24, 2025

बालकाला ठेवले कामावर ; मुकादमावर झाला गुन्हा दाखल

crime-1-5

बारामती : बारामतीत प्रशासकीय यंत्रणा काम करते का ? नाही असा सवाल उपस्थित होताना वारंवार निदर्शनास येत आहे, त्याचे कारणही तसेच आहे बारामतीत पुन्हा एका खाजगी ठेकेदाराचा मनमानी कारभार सजग पत्रकारामुळे समोर आला आहे. एका खाजगी ठेकेदाराने सरकारी कामावर अल्पवयीन मजूर ठेवल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी पत्रकार अभिजित कांबळे यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पत्रकार अभिजित कांबळे हे त्यांच्या कामानिमित्त बारामतीतील शारदानगर येथे दि. १० मे रोजी सकाळी गेले होते तेव्हा शारदानगर येथे कॅनॉलच्या उजव्या बाजूस सार्वजनिक बांधकाम विभागाचे मे एव्हीटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांनी घेतलेल्या निरा – बारामती या मुख्य डांबरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे मात्र त्या कामावर  एका किशोरवयीन बालक ज्याचे वय पंधरा वर्षे असून तो ( मूळ रा. महाराजापूर तालुका रतुवा जिल्हा मालदा पश्चिम बंगाल ) येथील आहे.

पत्रकार कांबळे यांच्या सजगतेमुळे त्यांच्या लक्षात आले की सागरचा बालक हा अल्पवयीन असुन तो सरकारी कामावर काम करीत आहे. त्यामुळे एकूणच या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले एकतर हा अल्पवयीन बालक बेकायदेशीर काम करतोय का ? त्याचे अपहरण करून त्याला बळजबरीने कामाला लावले जात आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. अखेरीस कांबळे यांनी पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला आणि ठेकेदाराचा मुकादम अजय मांढरे (रा. अभीपुरी ता. वाई ) यांनी किशोरवयीन बालक अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील कामावर ठेवले त्यामुळे मुकादमाविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यापूर्वी देखील तालुक्यातील पणदरे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सरकारी कामावर काम करीत असताना एका अल्पवयीन परप्रांतीय बालकाचा जीव गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा दुसऱ्या सरकारी कामावर बेकायदा अल्पवयीन बालकाकडून काम करवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये ठेकेदारास जबाबदार न धरता त्यांच्या मुकादामांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एकूणच या घटनावरून सरकारी कामावर सरकारी बाबु किती संवेदनशील काम करीत आहेत हे लक्षात येत आहे.

You may have missed

error: Content is protected !!