October 24, 2025

बिरदेव डोणे यांच्या सत्काराचे बारामतीत आयोजन

1002725476
बारामती : यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (U.P.S.C.) परीक्षेत यशस्वी होऊन आय पी एस पदी निवड झालेले बिरदेव डोणे यांचा सत्कार समारंभ बारामती येथे बुधवार दिनांक 7 मे  रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
येथील नटराज नाट्य कला मंडळ बारामती येथे भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार कु. रेश्मा पुणेकर यांच्या शुभहस्ते हा सत्कार समारंभ होणार असून त्याचवेळी विद्यार्थ्यांसाठी डोणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शालेय, महाविद्यालयीन आणि इंजिनिअरिंगच्या पदवी पर्यंतचे शिक्षण विशेष गुणवत्तेने पूर्ण केलेल्या बिरदेव डोणे यांनी त्याच जिद्दीने यु.पी.एस.सी. परीक्षेत देखील प्रशंसनीय यश संपादन केले असून त्यांचा हा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. याच उद्देशाने त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

You may have missed

error: Content is protected !!