बारामतीत अवैध धंदे जोमात ; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
बारामती : बारामती शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक प्रशासनाचे लक्ष असूनही काही भागांमध्ये खुलेआम अवैध मद्यविक्री, जुगार अड्डे, गुटखा विक्री, वेश्याव्यवसाय आणि इतर पांढरपेशी व्यावसायिकांनी सुरु केलेले बेकायदेशीर अवैध धंदे जोमात सुरु असल्याची माहिती वारंवार समोर येत आहे.
विशेषतः शहरातील आणि शहराच्या वाढीव हद्दीतील भागात, लोक वस्तींमध्ये , वर्दळीच्या परिसरात तसेच काही नवविकसित वसाहतींमध्ये या अवैध धंद्यांचा ऊत आला असल्याचे नागरिक सांगत आहेत. स्थानिकांनी यासंदर्भात वारंवार मौखिक तक्रारी करूनही संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाला यावर भाष्य करायला फुरसत नाही, शहरातील काही ठिकाणी अवैध दारू विक्रीवर कारवाया केल्याचा फार्स केला जात आहे, मात्र तिथेच राजरोस सुरु असलेल्या क्लबचे काय ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गुठखा बंदी असताना बारामतीत राजरोसपाने सर्रास गुठखा विक्री सुरु आहे तर प्रशासन पुढील काळात काय कठोर पावले उचलनार हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी रात्रीच्या वेळी अवैध ( परवानगी नसलेले धंदे ) जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी यावर तातडीने कारवाईची करण्याची मागणी केली आहे. “शहराची शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा धंद्यांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे,” असं मत काही ज्येष्ठ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. बारामतीतील वाढत्या अवैध धंद्यांमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून, प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कठोर भूमिका घेण्याची गरज देखील व्यक्त केली जात आहे.
