October 24, 2025

सोशल मीडियाचा गैरवापर युवकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

WhatsApp Image 2025-04-01 at 4.37.56 PM

बारामती : इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो व अश्लिल मजकुराची स्टोरी टाकणाऱ्या युवकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळीत कायद्याचा दणका दिला.

9 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन शालेय मुलीच्या फोटो वापरुन त्या फोटोवर तीचे चारीत्र्याची बदनामी होईल असे जाणीवपूर्वक अश्लिल मजकुर लिहुन त्याची इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर स्टोरी ठेवलेचा प्रकार संबंधित शालेय विदयार्थिनीचे वडीलांना व कुटुंबियांना माहीती मिळाल्यानंतर पिडीत शालेय विदयार्थिनीचे वडीलांनी घडले प्रकाराबाबत माळेगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारीच्या आशयाने व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, एका अनोळखी इसमाने समाजमाध्यमाचा गैरवापर करुन बदनामी होईल, अशी कृती केलेने पिडीत मुलीसह संपुर्ण कुटुंबातील सदस्यांचे सामाजिक आयुष्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेने गुन्हयात वापरलेले इन्स्टाग्राम खाते व त्याचा वापर करणारे अज्ञात आरोपीची माहीती शोधणेकरीता माळेगाव पोलीस ठाणे यांनी इन्स्टाग्राम व फेसबुक या समाजमाध्यम चालविणाऱ्या मेटा प्लॅटफॉर्म या अमेरिकास्थित जागतिक कंपनीच्या कार्यालयाकडे संबंधित इन्स्टाग्राम खातेची माहीतीसाठी पत्रव्यवहार करुन त्यांचेकडुन माहीती प्राप्त करुन घेवुन त्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा पवन राजेंद्र क्षिरसागर ( वय- 21 वर्ष, रा. ढाकाळे ता. बारामती ) यानेच केल्याची माहीती मिळाली आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस पोलीस अधीक्षक,गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, तालुका पोलीस ठाणे व तपास पथकातील माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक तुषार मोर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप,यांनी केली.

You may have missed

error: Content is protected !!