घरफोडीत चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी केला परत
बारामती : सचिन विठ्ठल करे रा. पळशी ता बारामती यांची अज्ञात चोराने घरफोडी करून दोन लाख 49 हजारांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला होता पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीत चोराला बेड्या ठोकत फिर्यादीला मुदेमाल परत केला.
चोरीला गेलेला ऐवज कोर्ट कचेरी न करता परत मिळाल्याने करे यांनी समाधान व्यक्त केले ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी केली. पोलिसांनी जप्त केलेला ऐवज उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या हस्ते फिर्यादी करे यांना परत देण्यात आला.
