October 23, 2025

बारामतीत होऊ घातलेले सैराट वेळीच ॲड.धर्मपालदादा मेश्रामसाहेबांनी रोखले

WhatsApp Image 2025-03-06 at 8.04.27 PM

बारामती : तालुक्यातील माळेगाव येथे उच्चशिक्षित बौध्द युवकाला आंतरजातीय विवाह केला म्हणून मारहाण करून नातेपुते माळशिरस या परिसरातील काही गावगुंडांनी नवविवाहित दाम्पत्याला बळजबरीने अपहरण करून जबरी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आंतरजातीय विवाह केल्याने नवविवाहितेला जबरदस्तीने तिच्या पतीपासून  वेगळे करून तिचे अपहरण केल्याची नुकतीच घटना घडली होती. मात्र अनुसुचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या मुळे भोर नंतर बारामतीत होणारे सैराट रोखले गेले आणि वेळीच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

या मारहाणीच्या व जातीदोषातून दिलेल्या वागणीबदल नवदांपत्यांनी ॲड.अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून न्यायासाठी प्रथम पोलिस दरबारी दाद मागितली मात्र दाद न मिळाल्याने अनुसुचित जाती जमातीच्या आयोगाचे राज्याचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा पुणे जिल्हयाचा दौरा होता त्यावेळी ॲड.अक्षय गायकवाड यांनी भोर येथील विक्रम गायकवाड या तरूण युवकांचा आंतरजातीय विवाह केल्यामुळे खुन झाल्याचे प्रकरण ताजे असताना बारामती तालुक्यातील मौजे माळेगाव येथील तरुणाचे अंतरजातीय विवाह केल्यामुळे अपहरण व मारहाण झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बारामतीत मेश्रामसाहेबांनी संबधित गुन्हा तात्काळ दाखल करून संबधीत आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिले.

नव विवाहित दांपत्य हे साधारण 2021 पासून महाविध्यालायात शिकत होते त्याना नंतर त्यांची मैत्री होऊन प्रेम झाले. त्यानंतर 28 डिसेंबर 2024 रोजी दोघांनी आळंदी येथे जाऊन लग्न केले. लग्न करून घरी येत असताना त्याचे गाव गुंडांनी अपहरण करून बेदम मारहाण केली‌ .त्यानंतर यातील युवकाच्या डोक्याला बंदुक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

अनुसुचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या आदेशाने सासवड पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल झाला आहे. व आयोगाच्या आदेशानुसार या गुन्हयाचा तत्काळ तपास केला जाईल आणि सरकारच्या आदेशानुसार आंतरजातीय विवाह केलेला दाम्पत्याला पोलीस देखील सरंक्षण  द्यावे असे आदेश आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

You may have missed

error: Content is protected !!