December 8, 2025

श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे आगमन

WhatsApp Image 2025-02-28 at 5.51.05 PM

बारामती :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे.

सद‍्गुरू श्री स्वामी समर्थ पादुका पालखी उत्सव समिती यांच्या वतीने अक्‍कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखी उत्सवाचे आयोजन शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वां. पालखीचे आगमन बारामती शहरात होणार आहे. पालखीचा मुक्‍काम चिराग गार्डन, रेल्वे स्टेशन समोर भिगवण येथे होणार आहे. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रम, महाआरती नंतर सर्व भाविक भक्‍तांना महाप्रसादाचे आयोजन रात्री 11 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रात्री 8 ते १० वाजेपर्जंत जय गिरिनारी दत्तपंथी सोंगी भजनी मंडळ, खंडाळा यांच्या वतीने सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्‍या दिवशी रविवार दि. २ मार्च रोजी सकाळी 6 ते 7 वां. श्री स्वामी समर्थ पादुकांना महाअभिषेक व दर्शन सोहळा होणार आहे.

ज्या भाविकांना अभिषेकमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी येताना दूध घेऊन यावे असे आवाहन आयोजक श्री स्वामी समर्थ पालखी उत्सव समिती, महावीर पथ, बारामती यांच्या वतीने राजाभाऊ थोरात यांनी केले आहे. सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ पादुका पालखी पुढील गावी रवाना होणार आहे. तरी सर्व बारामती मधील भक्‍तांनी श्री अक्‍कलकोट स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
कार्यक्रमाविषयी माहितीसाठी संपर्क.- राजाभाऊ थोरात मो.9860931637 , नवनाथ गजाकस -8600516666, विकास जगताप – 7798391111.

error: Content is protected !!