October 24, 2025

माळेगाव कारखाना येथे कामगारांचा वजनकाटा बंद आंदोलन

WhatsApp Image 2025-02-22 at 4.13.49 PM

बारामती (प्रतिनिधी – संदीप आढाव)  :  एका ऊसतोड मजुराचा माळेगाव कारखाना परिसरात ट्रकटरच्या खाली येऊन मृत्यु झाल्याने ऊस तोड कामगार यांनी आक्रमक पावित्रा घेत माळेगाव कारखाना परिसरात वजनकाटा बंद तसेच ठिय्या आंदोलन करून माळेगाव कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाला चांगलेच धारेवर धरले घटनेची फिर्याद दाखल केल्यानांतच आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यानच्या काळात दि 18 फेब्रुवारी रोजी ऊस तोड मजूर हिरामण चरणदास चव्हाण ( वय 47 ) हा त्याची बैलगाडी घेवून शारदानगर येथे ऊसतोडायला गेला होता तो ऊस तोडुन माळेगाव साखर कारखाना येथे दुपारी 03/00 वाजता बैलगाडीमध्ये ऊस घेवून आला होता व बैलगाडी यार्डामध्ये नंबरला लावून रात्री 12/00 वाचे सुमारास तो गाडीचा नंबर कितवा आहे हे पाहणेसाठी गाडी सोडुन गेला होता त्यावेळी कोणत्यातरी अज्ञात ट्रॅक्टर चालकाने यार्डामध्ये त्याचा अपघात होवून तो मयत झालेला आहे. त्यास माळेगाव साखर कारखानेचे ॲम्बुलन्स मध्ये रात्री रुई ग्रामीण हॉस्पीटल मध्ये नेले त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

झाला प्रकार कारखान्याने दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ऊस तोड कामगार यांनी आक्रमक पावित्रा घेत माळेगाव कारखाना परिसरात वजनकाटा बंद तसेच ठिय्या आंदोलन करून माळेगाव कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाला चांगलेच धारेवर धरले, कामगारांनी आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर अज्ञात ट्रकटर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाल्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येयील असे आश्वासन सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी यावेळी आंदोलक ऊस तोड कामगारांना दिले.

You may have missed

error: Content is protected !!