ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती : बारामती नगरपालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अन्यथा दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मुख्यधिकारी महेश रोकडे यांना निवेदनाद्वारे योगेश नाळे यांनी दिला आहे.
बारामती नगरपालिकेने ठेकेदार नितीन डी कदम हॉस्पिटॅलिटी यांच्यासोबत कचरा संकलन, वाहतूक आणि वर्गीकरणाचा ठेका दिला आहे त्या ठेकेदाराच्या 407 वाहनाने नाळे हे आपल्या मुलीला शाळेत सोडविण्यासाठी जात असताना दि. 7 जानेवारी रोजी अपघात झाला. त्यानुसार संबंधित वाहन चालका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणात आला आहे. मात्र नगर पालिकेने केलेल्या करारा नुसार वाहन चालक कर्मचारी यांच्याकडून अपघात झाल्यास त्याची सर्व जबाबदारी ठेकेदाराची राहील अशी अट आहे त्या अटी नुसार वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचे लायसेन्स नसताना वाहन चालविण्यास दिले त्यामुळे ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल करावा आणि त्यासाठी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ठेकेदाराला देखील सह आरोपी करण्यासाठी लेखी पत्र द्यावे यासाठी दि 13 फेब्रुवारी रोजी मुख्यधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे असे दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.