October 24, 2025

माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील तिघेजण तडीपार

vsrs-news-tadipar

बारामती : माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील तिघांवार तडीपारिची कारवाई करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरीकांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, नागरीकांना जबर दुखापत करणे तसेच शालेय विदयार्थिनी व महीलांची छेडछाड करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माळेगाव पोलीस
ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे कांबळेश्वर ता. बारामती येथील सुरज पांडुरंग जाधव, ( वय-२५ वर्षे ),  चेतन पांडुरंग जाधव, (वय-२४ वर्षे ) व अर्जुन बाळासो आडके ( वय २२ वर्षे  )  संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातुन तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअन्वये पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, यांच्या कार्यालयास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.
सदर तडीपार प्रस्तावाची पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सखोल चौकशी करुन वरील नमुद तिघांना संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीमधून (पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय सह ) ०१ वर्षे कालावधी करीता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक,पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर, यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे, प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, कर्मचारी जालिंदर बंडगर, महेश बनकर, रामदास बाबर यांनी केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!