बाल लैगिक अत्याचार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
बारामती : बारामती शहर पोलिस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार अधिनियमाने व ॲट्रॉसिटी ( अनुसूचित जाती जमाती अत्याचार आधीनियामा अंतर्गत ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की खालच्या जातीच्या बाया वेश्याव्यवसाय करण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून निराधार महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला असे दोन्ही मायलेकींना आरोपी यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली यासोबतच जर पोलिसात तक्रार दिली तर तुम्हा दोघींना जीवे मारून टाकीन पोलीस माझ्या खिशात आहेत पोलीस माझं काय वाकड करू शकणार नाहीत अशीही धमकी दिली या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार अधिनियमाने व ॲट्रॉसिटी ( अनुसूचित जाती जमाती अत्याचार आधीनियामा अंतर्गत ), तसेच जीवे मारण्याची धमकी देणे, विनय भंग करणे या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
