October 24, 2025

तो..गब्बर झालेला कर्मचारी आहे तरी कोण ?

WhatsApp Image 2025-01-23 at 1.59.02 PM

बारामती : बारामती शहराच्या गल्ली-गल्लीत एका ओलिस कर्मचारी याची चर्चा सुरु असुन साध्या मटक्या वाल्या पासून ते थेट मोठ मोठ्या अवैध धंद्यांच्या डील करीत माया गोळा करणारा तो गब्बर…झालेला कर्मचारी आहे तरी कोण ?  अशी शहरात चर्चा सुरु आहे.

सदरच्या कर्मचारी यांनी निवडणुकीच्या आधी बंद केलेले अवैध धंदे हाप्ते बांधून पुन्हा सुरु केले आहेत, तर आपल्या वरिष्ठांकडे तक्रारी गेल्यामुळे त्याने कर्तव्य कमी आणि वसुलीवर भर जास्त दिल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात किरकोळ तडजोडी पासुन, मटक्याचा चटका आणि अवैध जुगाराचा लटका अशी अवास्था बारामतीची केली आहे. त्याने राजरोसपणे अनेक ठिकाणी बंद केलेले क्लब सुरु करून मोठी माया गोळा करण्याचा पिंड बांधला आहे.

या कर्मचाऱ्यांने चक्क आपल्या वरिष्ठांच्या हातावर तुरी देत परस्पर लागेबांधे करून माया जमा करण्याचा जणु सपाटा लावला आहे त्याच्या या सर्व दुष्कृत्याची तक्रार बारामतीच्या काही नागरिकांनी केल्या आहेत तसेच येणाऱ्या काळात त्याची बदली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढा हौदोस घातल्याने त्याच्या विषयी चौका-चौकत संताप व्यक्त केला जात आहे.

या बारामतीच्या गब्बर कर्मचाऱ्यांची चर्चा शहराच्या गल्ली पासून थेट दिल्लीत होऊ लागली आहे कारण त्याची गोपनीय चौकशी सुरु असल्याची देखील शहरात चर्चा आहे.

अधिक माहिती सह लवकरच आणखी पुढची बातमी केली जाईल……क्रमश:    

You may have missed

error: Content is protected !!