व्याजाच्या पैशांसाठी गळफास घेऊन आत्महत्या, आठ सावकारांवर गुन्हा दाखल
बारामती : सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला असून या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की मौजे झारागडवाडी ता. बारामती येथील रामभाऊ करे ( वय 40 वर्षे ) यांनी दि.12 जानेवारी रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद 16 जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आठ सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. तर तु मेला तरी तुला पैसे सोडणार नाही अशी धमकी संबंधित सावकारांनी दिली होती तसेच त्यांना वारंवार व्याजाच्या पैशांचा तकादा लावला होता. तसेच व्याजाच्या पैशांसाठी दमदाटीकरून जीवे मारण्याची धमकी देखील सावकारांनी दिली होती, व्याजाचे पैसे डबल देवूनही सावकारी रक्कम संपण्याचे दिसत नाही तसेच सावकारांनी जगणे मुश्कील केले होते त्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
