अबब… बारामतीत भर दिवसा घरफोडी
बारामती : बारामतीचे गुन्ह्याचे सत्र थांबायचे काय कमी होताना दिसत नाही, बारामतीत चक्क भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून या घर फोडीत 17 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरांनी लंपास केला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, मौजे जराडवाडी ता.बारामती येथे दि. 15 जानेवारी रोजी दुपारी साधारण साडेबार ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घरफोडी झाली आहे. यात अज्ञात घरफोडी करानाऱ्या चोरांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला आणि घरात ठेवलेले 14 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रोख रक्कम असा सातारा लाख वीस हजारांचा ऐवज घरफोडी करून लंपास केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
