October 24, 2025

साखळी चोरी करणाऱ्या चोराच्या वेळीच आवळल्या मुसक्या

WhatsApp Image 2025-01-11 at 2.20.09 PM

बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चोराचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळल्या असून त्याला अटल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर  यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या तपास लावून झालेला गुन्हा उघडकिस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार रेकॉर्डवरील आरोपी व गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार स्वप्नील आहिवळे यांनी सदरचा इसम हा निखिल उर्फ कुलदीप नंदकुमार अलगुडे ( रा. भैरवनाथवाडी, ता. बारामती )  हा असुन सदरचा गुन्हा हा त्यानेच केला आहे. सदरच्या माहितीची खातरजमा जमा करून ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली

सदर कामगिरी  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,  अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ , पोलिस सहाय्यक इस्पेक्टर युवराज पाटील, पोलिस हवालदार अभिजीत एकशिंगे, पोलिस हवालदार स्वप्निल आहीवळे पोलिस हवालदार अतुल डेरे, टिळेकर यांनी केली.

You may have missed

error: Content is protected !!