बँकेच्या सुरक्षा ठेवीवर अज्ञाताने काढले कर्ज, 5,38,600 एवढ्या रकमेचे ऑनलाईन फसवणूक
बारामती : बारामतीत पुन्हा अचंबित करणारा प्रकार घडला आहे एका राष्ट्रीयकृत बँकेत ठेवलेल्या सुरक्षा ठेवीवर आणि बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर मोबाईल हॅक करून डल्ला मारून 5,38,600 एवढ्या रकमेचे ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा घडला आहे या प्रकरणी निवृत्त जेष्ठ नागरिकाने बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय फिर्यादीचा मोबाईल हॅक करून फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया या बँकेच्या खात्यावरील सुरक्षा ठेवी अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि 50 हजार या तिन्ही सुरक्षा ठेवीवर वर 5,38,600 एवढ्या रकमेचे ऑनलाइन पद्धतीचे कर्ज घेऊन व तसेच बचत खात्यावरील शिल्लक रक्कम 10, हजारातील 9500 असे एकूण 5, लाख 48 हजार,100 रुपयांची कोणीतरी अज्ञात इसमाने फसवणूक केली आहे.
