October 24, 2025

तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन

WhatsApp Image 2025-01-03 at 7.35.18 PM

बारामती :  राजगुरुनगर तालुका खेड येथील गोसावी समाजाच्या दोन लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ गोसावी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राजगुरूनगर ता. खेड येथील ही हृदयद्रावक घटना 27 डिसेंबर रोजी समोर आली होती राजगुरूनगरसह राज्यत हळहळ व्यक्त केली जात आहे  या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी गोसावी समाजाच्या वतीने प्रशासनाला यावेळी करण्यात आली. या दोन अल्पवयीन लहान मुली दोन्हीही संख्या बहिणी होत्या, नराधमाने या लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्या दोन्ही मुलींची निर्घुण हत्या केली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी उमटत आहेत. बारामतीत गोसावी समाजाच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी गोसावी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!