बँक केवायसी च्या नावाखाली 12 लाख 95 हजाराची फसवणूक
पुणे : बँक केवायसीच्या नावाखाली 12 लाख 95 हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अज्ञात मोबाईल धारकाने दिनांक 22 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 रोजीच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून द्वारे अनोळखी मोबाईल धारक यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून ते नॅशनल बँकेचे अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवुन बँकेचे केवायसी अपडेट नसल्यामुळे बँक खाते ब्लॉक करण्यात आले असून ते पुढे चालू ठेवण्यासाठी एपीके फाईल पाठवून त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले आणि फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या खात्यामधून 12 लाख 95 हजार रुपये काढून घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी येरवडा पुणे येथील एका वयोवृद्धाने फिर्याद दाखल केली असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
