नशेसाठी वापरले जाणारे मेफेटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या महिलेस पोलिसांनी केली अटक

बारामती : नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची विक्री करणाऱ्या महिलेस हडपसर तपास पथकाकडून अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी अंदाजे एक लाख किमतीच्या मेफेटरमाइन सल्फेट (टर्मिनच्या) 160 बाटल्या जप्त केल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून हडपसर परिसरातील अल्पवयीन मुले मेफेटरमाइन ( टर्मिनचे ) इंजेक्शन घेऊन नशा करून गुन्हेगारीकडे वळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी छापा कारवाई करून संशयित महिला अंबिका उर्फ नेहा आनंद सिंग ठाकूर ( वय 26 वर्ष रा. माळवाडी हडपसर पुणे ) हिस ताब्यात घेऊन तिच्याकडून 160 मेफेटरमाइन सल्फेट (टर्मिनच्या) इंजेक्शनच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.
अधिक विचारणा केली असता सदरचे औषध हे नशा करण्यासाठी विक्री करीत असून ती प्रति इंजेक्शन 400 ते 500 रुपयाला विक्री करत असल्याचे सांगितले आरोपी महिला हिच्याकडे कोणताही औषधे विक्री परवाना नसताना सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना सदर औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणारे व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहीत असताना देखील नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाऱ्याने बेकायदेशीर रित्या विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला आरोपीकडे इंजेक्शनच्या एकूण 160 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत त्याची बाजारभावानुसार अंदाजे एक लाख रुपये इतकी किंमत आहे गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपयुक्त परिमंडळ पाच डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे. प्रशांत दुधाळ, निखिल पवार, कुडलिक केसकर, अमोल दनके, गायत्री पवार यांनी केली.