फरार असलेली महिला सायबर ठगी पुणे सायबर पोलीसाचे जाळ्यात
बारामती : एक वर्षांपूर्वी पुणे शहरातील नामाकीत बिल्डरला सायबर गुन्हा करून ४, कोटी०६ लाख,१७, हजार,३१६/- रुपयांची आर्थिक फसवणुक आरोपी महिला फरार झाली होती तिला पुणे सायबर पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या.
सायबर पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी, २०२४ येथे पुणे शहरातील नामाकिंत बिल्डर बोलतो असे सांगुन संबंधित कंपनीच्या अकाऊंटंट व्यक्तिद्वारे नामाकिंत बिल्डरच्या खात्यातुन एकुण ४,०६,१७,३१६/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची महिला आरोपी सायबर ठगी गुन्हा दाखल होताच पळुन गेली होती स्वतःचे अस्तित्व लपवुन वेगवेगळे मोबाईल नंबर वापरुन राहत होती. सुमारे ०१ वर्षापासुन ती फरार असल्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सदर गुन्ह्याचा स्वतः आढावा घेऊन सायबर तपास पथकाने दाखल गुन्ह्यातील आरोपीचे तांत्रिक विश्लेषण करुन सदर सायबर ठगी महिला दिल्ली येथे असल्याचे माहिती मिळाल्याने पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदिप कदम, पोलिस हवालदार सिमा सुडीत, निलम साबळे, पोलीस अंमलदार संदिप पवार, सचिन शिंदे यांना गुन्ह्याच्या तपासकामी तात्काळ दिल्ली येथे पाठविले. सदर तपास पथकाने न्यु दिल्ली येथिल स्थानिक पोलीसांच्या मदतीने जामीयानगर भागात फरार महिला सायबर ठगी हिचा शोध घेतला तेथिल महत्वाची माहिती तसेच पोलीस अंमलदार अश्विन कुमकर याला बिहार येथुन मिळालेल्या माहितीत ही महिला आरोपी ही गोपालगंज भागात असल्याची खात्रीशीर माहिती मिळुन आल्याने तपास पथकाने तात्काळ क्षणाचा विलंब न करता दिल्ली ते गोपालगंज, बिहार गाठले. तेथे गुप्त बातमीदार
व इतर महत्वाच्या माहिती द्वारे सायबर महिला ठगी ही राहत असलेल्या लोहरपत्ती, थावे गोपालगंज याठिकाणी वेशांतर करुन जवळच्या शेतात रात्रभर दबा धरुन बसुन तिच्या राहते घरात प्रवेश केला असता ती राहते घराच्या छतावरुन उडी मारुन पळुन जात असताना तिस शिताफीने पकडुन तिस अटक करण्यात आली आहे.
सायबर पोलीस स्टेशन यांनी सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार पुणे शहर, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (गुन्हे) पुणे शहर, पोलीस उप- आयुक्त विवेक मासाळ आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे, सुरेश शिंदे, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, पोलीस अंमलदार सिमा सुडीत, निलग साबळे, पोलीस अंगलदार गुंढे, कोंडे, संदिप पवार, सचिन शिंदे, दिनेश मरकड, अश्विन कुमकर, नागटिळक, स्वागत पळसे, यांनी कामगीरी केली.
