October 24, 2025

अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा जागीच मृत्यु

WhatsApp Image 2024-12-09 at 4.39.26 PM

बारामती : भिगवण रोडवरील जैनकवाडी ता. बारामती येथे प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला असुन या अपघातात दोन वैमानिकांचा जागीत मृत्यु झाला आहे तर दोन जन जखमी झाले आहेत.

बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवनच्या दिशेने चार चाकी गाडी हरीअर क्र.BR.03.AM 9993 यातून जात असताना, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून चार चाकीचा अपघात झाला आहे, यात दोघांचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये  दशु शर्मा  ( वय २१ वर्ष ,मूळ रा.दिल्ली) आणि आदित्य कणसे  ( वय वर्ष २९ रा. मुंबई ) वर्ष अशी मृतांची नांवे आहेत. तर कृष्णा सिंग ( वय वर्ष २१ मूळ रा.बिहार ) व महिला पायलट चेष्टा बिश्नोई ( वय वर्ष २१ वर्षे मूळ रा.राजस्थान) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

बारामती भिगवण मार्गावर जैनकवाडी गावानजिक पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. टाटा हरीअर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून हे चौघेजण बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते.  अपघात झाल्याचे समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, खाजगी रुग्णवाहिका चालक वाहक यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपचार मिळण्यासाठी भिगवन येथे घेऊन आलेले आहे. मात्र उपचारा दरम्यान यातील दोघांचा मृत्यु झाला. या विध्यर्थ्यांची शक्यतो रात्रीचे प्रशिक्षण असते पण हे विद्यार्थी भिगवणच्या दिशेने का निघाले होते ?  याची माहिती अद्याप मिळाली नाही.

You may have missed

error: Content is protected !!