आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
बारामती : माहेरच्या लोकांनी लग्नात मान-पान केला नाही, तसेच माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावीत पैसे न आणल्यास मरून जा असा तगादा पतीनेच पत्नीला लावल्याने पत्नीने कॅनॉलमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्त हाकीकात अशी की, एप्रिल 2016 नंतर मृत विवाहिता हिला तिचे पती वारंवार शिवीगाळ दमदाटी करून आमचा लग्नामध्ये मानपान केला नाही तसेच माहेरून पैसे आण, मला सोन्याची चैन आन असे म्हणून वारंवार मारहाण करून तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करून, वारंवार तू मरून जा असे म्हणून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
