बारामतीत बेकायदा वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा ; लॉज चालकासह कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
बारामती : बारामती राजरोसपणे सुरु असलेल्या बेकायदा वेश्या व्यवसाय करणारांवर पोलिसांनी छापा टाकला असुन या प्रकरणी लॉज चालकासह व्यवसाय चालविणाऱ्या कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारामतीतील एका लॉजवर अवैध मानवी व्यापार चालू आहे, अशी गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली त्यानंतर गोपनीय बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचून आणि बनावट ग्राहक पाठवून बनावट ग्राहकाचा इशारा होताच पोलिसांनी छापा टाकल्यावर काही मुली आणि महिलांच्या माध्यमातून बेकायदा वेश्या व्यवसाय करीत असलेल्या लॉज चालक आणि कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बारामती तालुक्यातील पारवडी पाटी येथील एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर बेकायदा देह व्यापार होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास झाले त्यानंतर पोलिसांनी लॉज मालक मॅनेजर यांना ताब्यात घेतले. बारामती तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
