जास्तीचा नफा पडला महागात ; ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणुक
पुणे : ऑनलाईन माध्यमाद्वारे शेअर ट्रेडिंग मार्फत जास्तीचा नफा मिळवुन देतो असे आमिष दाखवून चक्क 21 लाख 32 हजारांची फसवणुक केल्याचा प्रकार घडला आहे.
पुण्यातील कोंढवा येथील एका नागरिकाला ऑनलाईन शेअर ट्रेडिंग मार्फत जास्तीचा नफा मिळवुन देतो असे सांगुन त्याचा विश्वास संपादित करीत स्वतःच्या विविध खात्यामध्ये पैसे ट्घेऊन जास्तीचा नफा मिळवुन देण्याच्या बहाण्याने फिर्यादीची साधारण 21 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्राकार घडला आहे या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
