बारामतीत दहशत माजवण्याचा प्रयत्न ; परप्रांतीय युवकाला बेदम मारहाण
बारामती : बारामतीमध्ये दिवसेंदिवस रेकॉर्डवरील गुन्हेगार गुन्हेगारीचे सत्र सुरू ठेवत असून पोलिस प्रशासन त्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर वारंवार समोर येत आहे. तेच ते रेकॉर्डवरील गुन्हेगार वारंवार दहशत माजणवण्याच्या उद्देशाने गुन्हे करीत असल्याचे समोर येत आहे.
बारामती शहरातील फलटणरोड येथील मुल्लावस्ती येथे देखील असाच प्रकार झाला आहे या घटनेत एका परप्रांतीय युवकाला दहशत माजणवण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केल्याचे समोर आले आहे सविस्तर हकीकत अशी की दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फलटण रोडवरील मुल्ला वस्ती येथे गाडीला कट का मारला या कारणावरून परप्रांतीय युवकाला आरोपी ऋतिक दिनेश दामोदरे, बादशाह वाहिद आली आणि एक अनोळखी साथीदार ( सर्व रा. बारामती ) यांनी धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केली आहे याप्रकरणी मोहम्मद आदिल जुमे अली सलमानी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीला आरोपी यांनी लोखंडी गगजाने, काट्यांनी आणि लाथा बुकिने आप खुशीने गंभीर दुखापत करून शिवीगाळ दमदाटी केली आहे तर आरोपी अद्याप फरार आहेत.
