October 24, 2025

अ..बब.. 17 कुटुंबे ओलीस ठेवून चार लाखांची खंडणी मागितली

images (1)

बारामती ( प्रतिनिधी ) बारामतीत गुन्ह्यांचं एवढं प्रस्थ वाढले आहे की, खंडणीखोरांनी चक्क 17 कुटुंबे ओलीस ठेवून चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर हकीकत अशी की 15 ऑक्टोंबर रोजी पाटस बारामती पालखी महामार्ग रोडणे दोन ट्रक मधुन ऊस तोड मजूर कागवाड जिल्हा बेळगाव येथे निघालेले ट्रक बारामती ता शिरसुफळ फाटा येथून जात असताना अज्ञात स्कॉर्पिओ चार चाकी वाहन इतर चार दुचाकी मधील साधारण 18 जणांनी फिल्मी स्टांईलने ऊसतोड मजुरांच्या दोन ट्रक अडवून ट्रक मधील ऊसतोड मजुरांना लाकडी दंडुका दाखवीत शिवीगाळ दमदाटी करून जबरदस्तीने त्यांच्यासोबत तालुक्यातील गाडीखेल येथे नेले तेथे त्यांना त्यांच्या अन्नसामग्रीसह लहान मुलांसह अशा 17 कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देऊन ओलीस ठेवून त्यांच्या मुकादामाकडे चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी राहुल अंकुश गाढवे ( रा. गाडीखेल ता. बारामती ),  संजू पुना सोनवणे ( रा. वैदाने जि. नंदुरबार), राजेंद्र नांगरे पूर्ण नाव माहित नाही (रा. पारवडी, बारामती) , शक्ती नारायण गाढवे, नवनाथ मारुती गाढवे,  बापू अशोक धायतोंडे व इतर दहा ते बारा इसम असे 18 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दमदाटी करणे आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी फिर्याद संतोष बनसोडे यांनी दिली आहे.

You may have missed

error: Content is protected !!