युनायटेड स्पिरिट मॅकडॉल कंपनीमध्ये एक लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी
बारामती : येथील युनायटेड स्पिरिट लिमिटेड मॅकडॉल कंपनी पिंपळी येथे तेथीलच एका कामगाराने एक लाख रुपयांच्या तांब्याच्या धातुची चोरी केल्याचे उघड झाले आहे, त्या संदर्भाने बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर हकीकत अशी की बारामती येथील पिंपळी येथे युनायटेड स्पिरिट लिमिटेड मॅकडॉल कंपनीमध्ये दिनांक 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत सिलिंग हेड बॉटम मशीन मधून बॉटम प्लेट ( तांब्याच्या धातुची ) अशा एकूण वीस बॉटम प्लेट साधारण एक लाख रुपये किमतीच्या कंपनीत हाउसकीपिंगचे काम करणारा सनी सुखदेव डोंगरे याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून कंपनीचे व्यवस्थापक अरुणकुमार चंद्रण यांनी शहर पोलीस ठाण्यात सनी डोंगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
