आचार संहितेचा भंग केल्याने गुन्हा दाखल
बारामती : बारामतीत आदर्श आचार संहितेचा भंग केल्याच्या कारणावरून शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की दि. 27 ओक्टोबर रोजी बारामती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा येथील राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्या सभेदरम्यान आचारसंहिता लागू असताना आदर्श आचार संहितेचा भंग करून राजकीय पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सागर सस्ते यांनी तक्रार दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चौकशी करण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रमोद दुर्गाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती सदर चौकशी दरम्यान आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याचे निष्पन्न झाले त्या कारणावरून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा निवडणूक भरारी पथक प्रमुख तेजस जगताप यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात आदर्श आचार संहिता भंग केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
