October 24, 2025

साखळी चोरांचा बारामतीत सुळसुळाट, ….चालत्या वाहनावरून महिलेचे मंगळसूत्र नेले हिसकावून.  

1

बारामती : बारामतीत साखळी चोरांनी पुन्हा धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आसुन, शहरातील भिगवणरोडवर शतपावली करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दिड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गळ्यातून हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.

सविस्तर हकीकत अशी की, शहरातील एक महिला संध्याकळी भिगवणरोडवर शतपावली करीत असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनी चालत्या वाहनावरून फिल्मी स्टाईलने महिलेच्या गळ्यातील साधारण दिड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.  या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखळी चोरांचा शहरात सुळसुळाट झाला असून अनेक नागरिक अश्या घटनेचे शिकार झाले आहेत मात्र पोलिस प्रशासनाकडून यांचा साखळी चोरांचा किंवा गेलेल्या मुद्देमालाचा ठाव ठिकाण लागत नाही,  पदरमोड करून आडी-अडचणीसाठी केलेले महिला धन वारंवार शहर परिसरात चोरीला जात आहे  या साखळी चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!