October 24, 2025

कोणतीही निवडणूक लढणार नाही….खा. शरद पवार

465672384_1185774669577950_7781309237891501031_n

बारामती : मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे. अद्याप माझे दीड वर्ष आहे. मात्र दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचे किंवा नाही याचा विचार भविष्यात मला करावा लागणार आहे. तर लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या आहेत. तुम्ही एकदाही मला घरी पाठवले नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो असल्याचे मत जेष्ट नेते खा. शरद पवारांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील सुपे येथे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची प्रचारसभा झाली त्यावेळी जेष्ठ नेते शरद पवार बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की,  देशाचे पंतप्रधान हे सबंध देशाचे पंतप्रधान असतात मात्र दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान एका राज्याचे काम करीत आहेत, इथल्या कंपन्या आणि रोजगार गुजरातला नेत आहेत जर त्या राज्याचे काम करायचे असेल तर त्यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे देशाचे पंतप्रधान कशाला झाला आहात असा सवाल उपस्थित करीत शरद पवारांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. तर शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोन चांगला राहतो. मात्र दुर्देवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत”, अशी खंत शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केली. तर

मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची ती दाखवली जात नाही. त्याचा परिणाम म्हणजे इतले रोजगार दुसरीकडे चालले आहेत. ते थांबवायचे असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाहीअसे शरद पवार बोलताना म्हणाले.

सुपे परगण्यातील पाण्याचा प्रश्न आहे. यापूर्वी काय झाले याच्या खोलात मी जाणार नाही, मात्र एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण ज्यांच्यावर हे काम सोपविले, त्यांच्याकडून या कामाची पूर्तता झाली नाही, त्यामुळे काहीही झाले तरी इथला पाण्याचा प्रश्न मिटवल्या शिवाय राहणार नाही मला आमदारकी नको , खासदारकी नको तुमची राहिलेली कामे पूर्ण करणे हेच काम मी करणार असेही व्यक्त केले.

बारामतीकर भारी

तुम्ही भारी आहात,  तुम्ही मतदान करायला कधी चुकता ?  कालची निवडणूक ताईंची झाली. ताईंची निवडणूक काय साधी होती का ?  निवडणूक घरातीलच होती. पण तरीही बारामतीकर भारी आहेत. या तालुक्याने ताईंना ४८ हजार मते अधिक दिले. हे काम तुम्ही केले. आताही तुम्ही मागे पाहणार नाही. त्यामुळे मला चिंता नाही. उद्याच्या निवडणुकीत हाच दृष्टीकोन ठेवा”, असेही पवारांनी यांनी बोलताना व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!