बारामतीत साखळी चोर पुन्हा सक्रीय, ; व्यावसाईकाची साखळी नेली हिसकावून.

बारामती : दिवाळीच्या तोंडावर बारामतीत साखळी चोरांनी पुन्हा धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे, शहरातील अशोक नागरपरिसरात एक व्यावसाईकाची साधारण एक लाख रुपयांची गळ्यातील सोन्याची साखळी, गळ्यातून हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.
सविस्तर हकीकत अशी की, वडगाव निंबाळकर बारामती येथील व्यावसाईक काही कामानिमित्त बारामती शहरातील अशोक नगरमध्ये आले असताना, मोटार सायकलवरून हेल्मेट घालून आलेल्या दोन अनओळखी इसमांनी व्यावसाईकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी साधारण एक लाख रुपये किमतीची हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.