बारामतीच्या आरटीओचा पुन्हा नवा प्रताप चव्हाट्यावर
बारामती : मागच्याच महिन्यात बारामतीच्या पाटस रोड येथील टोलवर घडलेला प्रकार प्रकार ताजा असतानाच पुन्हा बारामती आरटीओ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा नव्या प्रकरणात मनमानी समोर आली आहे.
सविस्तर हकीकत अशी की बारामतीत बेकायदा ओव्हरलोड गाडीसाठी प्रतिमहा कार्ड स्वरूपात लाच घेतली जाते आणि त्यावर बेकायदा ओव्हरलोड केलेल्या गाड्याचे हप्ते घेऊन सोडल्या जातात असे अर्जदाराने अर्जात नमूद केले आहे. मात्र बेकायदा सुरू केलेल्या लाचस्वरूपाचे कार्ड असताना देखील ओव्हरलोड गाडीला दंड केल्याचं प्रकरण समोर आले आहे तर प्रतिमा लाच देऊन देखील दंड का केला ? अशी विचारणा केल्यानंतर संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांनी जाब विचारणाराला जातीवाचक शिवीगाळ करून आणि दम देऊन हाकलून दिल्याचा प्रताप समोर आला आहे. म्हणजे झालं असं की चोर ते चोर आणि वरून शिरजोर असला प्रकार समोर आला आहे. तर झाल्या प्रकारांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यानंतर देखील नेत्याच्या बड्या अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे समोर येत आहे या प्रकरणी अर्जदार बेमुदत उपोषण करणार असून याप्रकरणी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, आणि पोलीस निरीक्षक तालुका पोलिस स्टेशन यांना तक्रारी निवेदन दिले आहेत.
बारामतीतील प्रशासकीय अधिकारी स्तरावर लाचेच्या स्वरूपात अदृश्य कार्ड चालते आणि मासिक हप्ते बांधून घेतले जातात ही येकीव चर्चा होती मात्र या प्रकरणातून अखेर त्या चर्चेला पूर्ण रूप आले.
