बारामतीच्या चर्च ऑफ ख्राईस्टच्या समितीवर नवनियुक्त पॅनलचे वर्चस्व

बारामती : बारामती मधील चर्च ऑफ ख्राईस्ट यांच्या संस्थेच्या कॉन्फरन्स सदस्य या पदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन पॅनेल निवडणूक लढवत होते. पूर्वी पासून अस्तित्वात असलेल्या पॅनेल विरुद्ध सध्या निवडून आलेला नवीन पॅनेल अशी लढाई झाली. मात्र नवीन पॅनलने जुन्या प्रस्थापीत पॅनलचा धुव्वा उडवून आपले सर्वच्या सर्व 12 पैकी 12 उमेदवार निवडून आणले.
नवीन निवडून आलेल्या पॅनेलच्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे जयकुमार महादेवराव काळे, विवेक मधुकर साळवी, सचिन प्रेमचंद जाधव, राजेश शांतवान जाधव, नितीन बहिरु जाधव, सुनील सॅमवेल दुबे, राजू डेविड नॉर्टन, विलास शिवलाला गायकवाड, शशिकांत दौलतराव वागळे, विश्रांतीबाई शंकर जाधव, नितीन उल्हास कारभारी, अरविंद शिवाजीराव जाधव. अशी आहेत. सदर पॅनेल चे नेतृत्व निलेश कुलकर्णी आणि जयकुमार काळे यांनी केले.