October 24, 2025

बारामतीत अजित पवारांचा निषेध, तणावपूर्ण शांतता…

IMG_20240910_172524

बारामती  : बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरवर काळे कापड लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनीच हे केल्याने शहरात तणाव सदृश्य चर्चांणा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गणेश फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न आल्याने जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोला काळ्या कापडाने झाकुन निषेध केला.

दरम्यान तणाव वाढण्याची शक्यता पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करीत पवारांच्या फोटोवर काळे कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेतले.

सुरेंद्र जेवरे यांनी गणेशोत्सवानिमित्त शारदा प्रांगण येथे एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची कमान बारामतीच्या मुख्य चौकत लावण्यात आली होती त्यावर महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे कटआउट लावण्यात आले होते त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. त्या  कटआउटमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कटआउट वर काळे कापड लावून जेवरे यांनी अजित पवारांचा निषेध केला.

दरम्यानच्या काळात तणाव निर्माण झाल्याने नगरपालिकेने त्या कमानीवर असलेले महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे कटआउट लावण्यात आले होते त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते ते तिन्ही फोटो कामानिवरून उतरवून ताब्यात घेतले.

परवानगी शाळेच्या सुट्टी दिवसा पुरतीच

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एकनाथ फेस्टिवल ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे ती जागा शांतता झोन आहे तिथे नगरपालिकेची शाळा आहे. तसेच नगरपालिकेने शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी कार्यक्रम करण्याची परवानगी आयोजकांना दिली आहे मात्र प्रत्यक्ष शाळेच्या मुख्य प्रवेश द्वाराला आडवे आणि शाळेचा विचार न करता परवानगीचा गैर वापर केल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर या बाबत नगरपालिका परवाना अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता सुट्टीच्या दिवशी परवानगी असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली मग शाळा सुरु असताना टाकलेला भला मोठा पेंडॉल आयोजक काढणार का असा सवाल उपस्थित होतो.

कमान विना परवाना

ज्या कामानिवरून आणि कटआउट वर हा निषेध झाला त्या कटआउट आणि कमानीला मुळी परवानगी देखील पाचच दिवासांची घेतली आहे ती देखील चार दिवस आधीच लागली आहे.

नगरपालिका प्रशासन मुगगिळून गप्प

या झाल्या प्रकारात नगरपालिका प्रशासनाने बेकायदा परवानगी दिली आहे,  तसेच कर वसूल करण्यात काचुराई केली आहे,  त्याला उत्तर न देता नगरपालिका प्रशासन मुगगिळून गप्प आहे.

कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

बारामतीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कटआउटला काळे कापड लावून निषेध केल्याने बारामतीत काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. राष्ट्रवादीचे अजित पवार गट कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिकेक केला.

You may have missed

error: Content is protected !!