October 24, 2025

आठ दिवसात राजीनामे द्या.. अजित पवारांचे पदाधिकारी यांना आदेश.

6e56758a-9407-418e-95f7-312ffa656565

बारामती : बारामतीत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असलेल्या सर्व सेलच्या सर्व पदाधिकारी यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व सेलच्या सर्व पदाधिकारी यांना दिले.

बारामतीत राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट यांच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व सेलच्या पदाधीकारी यांचा जाहीर राजीनामा मागितला. पुढे पवार म्हाणाले की  बारामती लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली असून मात्र प्रत्यक्ष बुथवर जी कमिटी होती ती देखील कमी पडली आहे. त्यामुळे बूथ कमिट्या बदलाव्या लागणार आहेत, तर मला काही बदल संघटनेत देखील करायचे आहेत त्यामुळे सर्व सेलच्या बारामती शहर आणि तालुक्याच्या सर्व पदाधिकारी यांनी माझ्याकडे राजीनामे द्यावेत असे अश्या सूचना केल्या.

मला मिळालेल्या माहिती प्रमाणे काही बूथ कमिटीच्या पदाधिकारी यांनी मतदारांचे मत परिवर्तन करण्यापेक्षा त्यामध्ये तेल ओतायचे काम केले आहे, त्यामुळे ज्यांना राहायचे आहे त्यांनी मनापासून राहा बळजबरीने राहू नका, मला अनेकांनी सांगितले की, तुमच्या स्टेजवर बसायचे आणि आपलाच कार्यक्रम करायचा असे पक्षात सुरु आहे,  दादा तुमचा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही, तुम्ही त्याला एवढे दिले तरी काम मात्र त्याने चुकीचे केले आहे हे चालणार नाही  इथ बसणाऱ्या सर्वांनी आत्मचिंतन करावे की आपण प्रतिनिधित्व करीत असताना स्वतःच्या बुथवर जिथे मतदान किती मिळाले असा सवाल स्वतःला करावा 15 ऑगस्ट पूर्वी नवीन निवडी केल्या जातील असेही पवार यांनी सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!