प्रशासणाचा गलथान कारभार…..रस्ता खोदल्याने रुग्णवाहिका जाईना…
बारामती : रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी येण्या जाण्याचा रस्ता खोदल्याने तातडीच्या वेळी रुग्णवाहीका खोळंबली हा प्रकार बारामती सारख्या विकसित गावात घडला आहे.
झारगड वाडी येथील वयोवृद्ध व्यक्ती धनाजी बोरकर यांना अचानक छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात न्यायची वेळ आली मात्र बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी येण्या जाण्याचा रस्ता खोदल्याने तातडीच्या वेळी रुग्णवाहिकाच खोळंबली.
सविस्तर हाकीकात अशी की वयोवृद्ध धनाजी बोरकर वय 77 सकाळी छातीत दुखू लागले, तसेच धाप भरू लागली यामुळे तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी 108 नंबरला रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली होती मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाणीवपूर्वक येण्या – जाण्यासाठी अडथळा करण्यासाठी शेजारी राहणाऱ्यांनी रस्ताच खोदला आहे त्याचबरोबर याआगोदर काटेरी फांद्या आणि खांब उभा केले होते, यामुळे रुग्णवाहिका घरापर्यंत जाईना.. वयोवृद्ध व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली.. रुग्णवाहीका जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नेऊन वयोवृद्ध व्यक्तीला चालवत त्या ठिकाणी नेऊन रुग्णवाहिकेत बसवून पुढील उपचारासाठी दवाखान्यात हालवण्यात आले सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही याबाबत रस्त्यावर खोदकाम करणारे स्थानिक व्यक्तींना तहसीलदार गणेश शिंदे यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश देऊनही रस्त्यावर अडवणूक करून मानसिक त्रास देऊन खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, यामुळे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी तातडीने स्पॉटची पाहणी करून रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर तहसीलदार आणि बारामती तालुका ग्रामीण पोलिसांनी कारवाई करावी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण केलं आहे काढण्यात यावे त्यासाठी अनेकवेळा महसुली आणि पोलिस प्रशासन दरबारी निवेदने देखील दिली आहेत.
यासंदर्भाने तहसीलदार गणेश शिंदे यांनी पोलिस प्रशासनास पोलिस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचे पत्र दिले आहे मात्र दरम्यानच्या काळात स्थानिकांनी प्रशासकीय वेळखाऊ कारभारामुळे पुन्हा चक्क रस्ताच खोदला आहे.
यात धनाजी बोरकर आणि परिवार तसेच तिथल्या स्थानिकांचा जास्त मोठा वाद झाल्यावर कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मग तोपर्यंत पोलिस प्रशासन निर्णय कधी घेणार ? तर तंटामुक्त अभियानाला खुद्द महसुली आणि पोलिस प्रशासनच बगल देण्याची भूमिका घेत आहे.
