October 24, 2025

बारामती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र चेंबरवर निवड

Picsart_24-07-02_19-02-43-397
बारामती : बारामती व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष जगदीश पंजाबी व सहखजिनदार महेश ओसवाल यांची महाराष्ट्राची अग्रगण्य संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री व अँग्रिकल्चर (MACCIA) यांच्या कार्यकारणीच्या स्वीकृत सदस्य पदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व एग्रीकल्चर ही महाराष्ट्रात गेले 97 वर्षापासून कार्यरत असलेली मोठी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक हे प्रसिद्ध उद्योजक स्व. वालचंदशेठ दोशी ( वालचंदनगर इंडस्ट्री ) हे होते. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील उद्योग, इंडस्ट्री व एग्रीकल्चर या संदर्भातील महत्त्वाचे कामकाज केले जाते. नुकतेच या संस्थेची नवीन कार्यकारिणीची निवड झाली. यामध्ये चेंबरचे अध्यक्ष म्हणून ललित गांधी यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारणीमध्ये महासंघाच्या सदस्यांना घेऊन बारामती व्यापारी महासंघाचा बहुमान वाढवला आहे, हे बारामतीतील व्यापाऱ्यांसाठी भूषणावह असून बारामती व्यापारी महासंघाने गेले 20 वर्षात व्यापाऱ्यांसाठी केलेल्या कामकाजाची दखल राज्यस्तरीय संस्थेमार्फत घेण्यात आली. या माध्यमातून बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि विविध योजनांवर काम करण्याची संधी ही बारामती व्यापारी महासंघाला उपलब्ध झाली असल्याचे महासंघाचे संस्थापक नरेंद्र गुजराती, अध्यक्ष सुशीलकुमार सोमानी व सचिव स्वप्निल मुथा यांनी सांगितले.
नवनियुक्त सभासद जगदीश पंजाबी व महेश ओसवाल यांचा ललित गांधी यांच्यातर्फे गदिमां सभागृहामध्ये एका कार्यक्रमांत सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे सुशीलकुमार सोमानी, स्वप्निल मुथा, शैलेश साळुंखे,
प्रवीण अहुजा, संजय दुधाळ आदी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!