खा. सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते यांना आवाहन
बारामती : गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. तर अनेक ठिकाणी चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. हि कठिण परिस्थिती पाहता माझे आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सर्वांना नम्र आवाहन आहे की, माझ्या ३० जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज आदी लावू नये. तसेच विविध माध्यमातून जाहिराती देखील करणे टाळावे. त्याऐवजी आपण सर्वांनी दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी घटकांना, शालेय विद्यार्थ्यांना व गरजूंना मदत होईल अशा विधायक कार्यक्रम करावे. असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना केले आहे.
तसेच आपणा सर्वांना तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचविण्याची इच्छा असते. अनेकांना मला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गिफ्ट द्यायचं असतं. मात्र यापेक्षा आपण दुष्काळ पिडित बांधवांसाठी काही करु शकलात तर याच माझ्यासाठी सर्वात मोठ्या शुभेच्छा असतील असेही आवाहन खा.सुळे यांनी केले आहे.
