वैद्यकीय प्रतीनीधी संघटनेची वार्षिक सभा संपन्न
बारामती : महाराष्ट्र वैद्यकीय प्रतीनीधी संघटनेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी किरण नाझीरकर यांची बारामती शाखा सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र वैद्यकीय प्रतीनीधी संघटनेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच बारामतीतील आयोजित करण्यात आली होती, संघटनेचे सहाय्यक सचिव संजय वाघमोडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यानंतर संघटनेचे मावळते सचिव दत्तात्रय चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण करताना सर्व कर्मचाऱ्यांना संघटनेच्या कामगिरीची व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच, कामगारांवर होणारऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध संप पुकारून लढा उभारला आहे व पुढील काळात देखील खंबीरपणे हा लढा सुरू ठेवण्यासाठी संघटनेत सक्रीय सहभागी होणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर संघटनेचे खजिनदार भगवान गायकवाड यांनी अहवाल सादर करताना संघटनेच्या आर्थिक स्थितीची व संघनेच्या माध्यमातून झालेल्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमपत्रिकेनुसार, संघटनेने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी संदीप नलावडे, यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. संघटनेचे मावळते सचिव दत्तात्रय चव्हाण यांनी पुढील कालावधीसाठी किरण नाझीरकर यांची सेक्रेटरी तसेच भगवान गायकवाड यांची खजिनदारपदी, तर संजय वाघमोडे, स्वप्नील भोसले व शशीकांत देवकाते याची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने हा प्रस्ताव गगनभेदी आवाजात मंजूर केला.
त्यानंतर बाजीराव बोडरे यांनी, दत्ता चव्हाण, मनोज वाघमारे, मनोज काळोखे, रोहित कुंभार, संदीप नलावडे, प्रमोद माने, धनंजय विष्णूप्रद, बाजीराव बोडरे, अर्जुन भोसले, निलेश काकडे, प्रथमेश काशीद यांची कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती एकमताने करण्यात आली. यानंतर सर्वांनी नवनियुक्त शाखा सचिव किरण नाझीरकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या, यावेळी नवनियुक्त सहाय्यक सचिव स्वप्नील भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
