महारष्ट्रात सत्ता आणायची….शरद पवार
बारामती : माझा प्रयत्न आसा असाणार आहे की महाराष्ट्रात बदल करायचा महाराष्ट्रात सत्ता आणायची आणि जे काही लोकांचे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करायची, आणि स्वच्छ, चारित्र्य संपन्न राजकारणाची आणि समाज करणाची सुरुवात करायची असा निर्धार जेष्ट नेते शरद पवार यांनी काटेवाडी येथे बोलताना व्यक्त केला.
पुढे पवार म्हणाले की, सत्तेत असताना लोकांचे भले करण्याची शिकवण आम्हांला यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे, निवडणुका येतात आणि जातात मात्र यावेळची निवडणूक वेगळी होती, देशात मी कुठेही गेलो की लोकं विचारायची बारामतीत काय होणार…मात्र माझं मन सांगायचं की बारामती काय साथ सोडणार नाही, यावेळची निवडणूक संघर्षातून गेली, ही निवडणूक साधी सोपी नव्हती, यापूर्वीच्या निवडणुकीत मी जास्त नसायचो प्रचाराचा नारळ फोडला की मी महाराष्ट्रभर फिरायचो, यावेळेला एक प्रकारची शक्ती दिल्ली पासून लढत होती…. देशाचे पंतप्रधान यावेळी 18 ठिकाणी प्रचारासाठी आले, मात्र त्यांच्या अनेक ठिकाणी सभेत एकच विषय होता शरद पवार… भाग्य आहे माझे देशाचे पंतप्रधान माझे नाव घेतो ही काय साधी गोष्ट आहे काय ? काटेवाडीचा चमत्कार त्यांना कळला. त्यांनी माझ्यवर लक्ष ठेवले त्यांनी टीका टिपण्णी केली की त्याच्या उलट घडत होत… ते आपण जाहीर निवडणुकीत पाहिले, अश्या शब्दात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला
निवडणुकीत दमदाटी वगैरे काही देणे घेणे झाले माला माहित नाही, मात्र त्याच्या खोलात मला जायचे नाही, ज्याने केलं असेल, असुद्या कारण ते आपलंच त्यांच्याकडे गेलेलं असतं तेच परत आपल्याला मिळाले असते तर त्याचा विचार करावा लागेल तो भाग सोडून द्या, निवडणूक झाली आता पाठीमागच्या गोष्टी काढायच्या नाहीत आपण काम करायचे, या देशात लोकशाही आहे, जगातल्या अनेक देशात हुकुमशाही आहे, इथे हुकुमशाही आणायचा प्रयत्न होता, आमच्या राजकारण्यांपेक्षा तुम्ही सामान्य नागरिक अधिक शहाने आहात, तुमच्या शहांपानामुळे देशाची लोकशाही टिकली आहे, आज जगात भारत देशाला लोकशाही प्रधान देश म्हणून जे पाहिले जाते त्याचे श्रेय इथल्या सर्वसामान्य नागरिकांना आहे. कारण तुम्ही हुकुमशाहीकडे देश जाऊ दिला नाही,
मला कोणीतरी सांगत होत की काटेवाडी गावात फार विरोध झाला, गावात फार बदल झाला आहे, मी म्हंटलं त्याचा काही फरक झाला का ? तर नाही सुप्रिया निवडून आली आपल्याला, त्या फरकाची आणि विरोधाची गरज नाही, विरोध कितीही झाला फरक कितीही पडला तरी शेवटी मत कोणाला दिले निवडून कोण आले ? हे महत्वाचे आहे, असेही व्यक्त केले.
तर आता काही गोष्टीत मला लक्ष द्यावे लागणार आहे, आपल्या भागात छत्रपती साखर कारखाना आहे, पूर्वी हा कारखाना चांगला चालत होता मात्र आता काय झाले कोणास ठाऊक, आता कोण मार्गदर्शन करत आहे ?, त्याच्या खोलात जावं लागणार आहे, कारण माळेगाव कारखान्यापेक्षा सातशे ते आठशे रुपये कमी भाव दिला जात आहे. आता इथली कारखान्याची निवडणूक तुमच्या संसाराची निवडणूक आहे, आणि जेव्हा संसाराची निवडणूक असेल तेव्हा लक्ष घालावेच लागेल’, काही नेते मंडळींनी कारखानदारी आपल्या हातात ठेवली आहे, आणि मला एवढेच माहित आहे की दुसऱ्या कारखान्यापेक्षा या कारखान्यात कमी पैसे मिळत आहेत म्हणजेच तुमच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारत आहेत, ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला एकत्र राहावे लागेल कारण पूर्वी छत्रपती कारखाना एक नंबरचा होता आता छत्रपती कारखान्याचा एक नंबर कुठे गेलाय मला माहित नाही,
लोकसभा झाली, आता विधानसभा येणार, कारखान्याची निवडणूक येईल या सर्व ठिकाणी लोकहिताची कामे आपल्याला एकत्र येऊन करायची आहेत, मी सध्या बारामतीत फिरतो आहे गर्दी होते आहे मात्र यात बदल झाला आहे त्यामध्ये नवी पिढी, आणि गरिबांचे युवावर्ग आहे त्यामध्ये पूर्वीचे स्थानिक नेते दिसत नाहीत, त्यावर उपस्थितांकडून ती मलिदा गग असा उल्लेख आला त्यावर पवार म्हणाले, की आपल्याला यापुढे स्वच्छ कारभार कष्टाने उभा करायचा आहे जिथे मलिदा गग असेल तिथे त्यांना त्यांची जागा दाखवू असेही व्यक्त केले.
